Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अवघ्या १५ रुपयांत विकले जाताहेत अशोक खरातच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ

अवघ्या १५ रुपयांत विकले जाताहेत अशोक खरातच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ

नाशिक : खरा पंचनामा 

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीत न्यायालयाने खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्याली.

उद्या देखील त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरातच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर १५ ते २० रुपयांत विकले जात असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सायबर सेल कडून तपास करण्यात येत आहे.

फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि पॉर्न साईट्सवर १६ ते १७अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते. काही साईडवर हे व्हिडिओ पाहण्यासाठी 15 ते 50 रुपये आकारले असल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्याने पीडित महिलांची ओळख उघड झाली आणि त्यांना मानसिक धक्का बसला. त्यामुळे त्यांनी मानसोपचारतज्ञांकडून उपचार घेणे सुरु केले आहे. दरम्यान व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, खरातच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावरुन हटविण्यासाठी ४ जणांची टीम नियुक्त केली आहे. आतापर्यंत ४, ६५० लिंक्स डिलिट केल्या असून आतापर्यंत ६ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.