Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खरातने शरद पवारांच्या फोटोवर मारल्या होत्या फुल्या...?

खरातने शरद पवारांच्या फोटोवर मारल्या होत्या फुल्या...?

नाशिक : खरा पंचनामा 

राज्यात सध्या नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने खळबळ उडवून दिली आहे. खरातने अनेक महिलांवर अत्याचार तर केलेच आहेत. परंतु, त्याने अनेकांची फसवणूक सुद्धा केली असल्याची माहिती समोर आली आहे.

खरात संदर्भात दररोज समोर येणारी माहिती ही अनेक प्रश्न निर्माण करत आहे. अनेक नेतेमंडळींनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात उडी घेतली असून त्यांच्याकडूनही खरातच्या काळ्या कारनाम्याचा पर्दाफाश करण्यात येत आहे. एकीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातने कोणकोणत्या राजकीय नेत्यांसोबत संपर्क साधला होता, याचा सीडीआरचा प्रसार माध्यमांसमोर मांडलेला असताना आता सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी सुद्धा एक नवा करून खळबळ उडवून दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी याआधी सुद्धा शिंदे गटाच्या नेत्या नीलम गो-हे यांनी मंत्रिपदासाठी खरातची भेट घेतली होती, असा खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी नवा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

खरातने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या, असा दावा केला आहे. अशोक खरातने महाराष्ट्रातील आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्याचे सांगितले जात आहे. मला वाटतंय की ते शरद पवार यांचे नाव असू शकतात, असे देसाईंनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या फोटोवर काळ्या फुल्या केल्याचे सांगितले जात आहे. आता अजित पवार हयात नाहीत. यात कोणी काही चुकीचं केलं असेल तर संबंधीताला शिक्षा मिळालीच पाहिजे, अशी मागणी सुद्धा यावेळी तृप्ती देसाईंनी केली आहे.

अजितदादा कधीच अंधश्रद्धेला बळी पडले नाहीत. ते अशा गोष्टींना मानत नव्हते. मात्र, अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ नयेत, यासाठी अनेक नेत्यांचे प्रयत्न होते. काही जणांना अजित पवार, शरद पवार यांच्यापेक्षाही मोठे व्हायचे होते. अशा पद्धतीने खरातच्या माध्यमातून काळी जादू, अघोरी पूजा करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर त्या नेत्यांवर, संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. मात्र, तृप्ती देसाई यांच्या या दाव्यानंतर आता नेमके काय होणार? त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तृप्ती देसाईंच्या दाव्याला गांभीर्याने घेत याचा तपास करणार का? असे एक ना अनेक प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.