राष्ट्रवादीत पुन्हा वादाची ठिणगी!
प्रफुल्ल पटेलांच्या सभेत अजित पवारांचा फोटो नाहीच
मुंबई : खरा पंचनामा
सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील वाद अगदी चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे. काही ठिकाणी पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आढळून येत आहेत तर प्रमुख नेत्यांमध्येही विवाद सत्र सुरुच आहेत.
काही ठिकाणी पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आढळून येत आहेत तर प्रमुख नेत्यांमध्येही विवाद सत्र सुरुच आहेत. आता राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं काय घडलं?
अलीकडेच प्रफुल्ल पटेल यांची तिरोडामध्ये एक सभा पार पडली. या सभेतील बॅनरवर अजित पवारांचा फोटो नव्हता. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी 'तटकरे, पटेलांनी स्वतंत्र पक्षात असल्याचं दाखवून दिलं' अशी सूचक पोस्ट केली. पुढे ते 'पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे दिसून येत आहेत' असं देखील म्हणाले. लवांडेंच्या या पोस्टवर प्रफुल्ल पटेलांनी बोलणं टाळलं तरी नवीन वाद पेटल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.