अखेर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुहूर्त लागला!
तीन उपाधीक्षकांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या पोलीस दलासह नागरिकांना बहू प्रतीक्षेत आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या यंदाच्या बदल्यांना मुहूर्त लागला आहे. राज्यातील तीन पोलीस उपाधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाच्या सह सचिव सुप्रिया धपाटे यांच्या सहीने बुधवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
बदली करण्यात आलेले अधिकारी :
विष्णू नाथा ताम्हणे : अपर पोलीस अधीक्षक (एटप) गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर ते सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर.
शैलेश कुमार लक्ष्मीनारायण अंचलवार : पोलीस उप अधीक्षक, विशेष सुरक्षा विभाग, मुंबई. ते सहायक पोलीस आयुक्त, नवी मुंबई.
अजय खाशाबा सावंत : पोलीस उप अधीक्षक, अ.ज.प्र.त.स. कोकण विभाग, ठाणे ते सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर.
खाबुगिरी हेच कर्तव्य समजणाऱ्या प्रमुखाच्या बदलीसाठी कनिष्ठ अधिकाऱ्यांची फिल्डिंग
मंथली, गुन्ह्याचे कलम कमी करणे, पैशांसाठी गुन्हे दाखल करणे, राईट, लेफ्ट हॅन्ड नेमून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीतही टेंडर काढणाऱ्या, जातीवादी नेमणूका करणाऱ्या प्रमुखाची बदली कधी होणार अशी विचारणा अधिकाऱ्यांकडून होत आहे. होम, हवन, अघोरी पूजा करूनही त्याला नियुक्ती मिळणार नाही अशीही चर्चा पोलीस दलात होत आहे. बदलीसाठी पात्र, कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांनी राजकीय नेते, गॉडफादर यांचे उंबरे झिजवण्यास महिनाभर आधीच सुरु केले आहे. त्यामुळे बदली पात्र अधिकाऱ्यांनी आता बदलीसाठी देव पाण्यात घातले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.