Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच...अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचे धक्कादायक कारनामे समोर

मुलींना कॅफेत घेऊन बासायचा अन् तिथेच...
अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचे धक्कादायक कारनामे समोर

अमरावती : खरा पंचनामा 

अमरावती येथील मुलींचं झालेलं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले, या प्रकरणात रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. ब्लॅकमेलिंग करण्याच्या उद्देशाने हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते.

मुख्य आरोपी अहमद अयान आणि त्याचा मित्र उझेर खान यांच्यात वाद झाल्यानंतर उझरेनच त्याच्याकडे असलेले मित्राचे व्हिडीओ सोशल साईट्सवर व्हायरल केल्याचेहीव उघड झाले होते. पैशांच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर उझेरने मित्राला दगा देत त्याचे व्हिडीओ एकेक करून सोशल साईट्सवर टाकले होते.

आरोपी अयान हा ज्या कठोर नाका भागातील फ्लॅटवर मुलींचे लैंगिक शोषण करत होता त्याच भागात असलेल्या "द कॅफे रॉयल 10" मध्ये देखील तो मुलीांना घेऊन जायचा. एवढंच नव्हे तर या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी अयान हा कॅफे चालकाला चारशे रुपये द्यायचा. या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे सुरक्षित कंपार्टमेंट आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.