कर्मवीर पतसंस्थेला २० कोटी २१ लाखाचा ढोबळ नफा
चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांची माहिती
सांगली : खरा पंचनामा
येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेला मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात २० कोटी २१ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाल्याचे व संस्थेच्या ठेवी, कर्जामध्ये उत्तम वाढ झाल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांनी दिली. संस्थेच्या मार्च २०२६ अखेर प्रगती दर्शक आकडेवारीची माहिती देत असताना संस्थेने चार आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये केलेल्या प्रगतीची आकडेवारी त्यांनी प्रसार माध्यमाना दिली.
आर्थिक वर्षात संस्थेने २२७५ कोटी रुपयांचा मिश्र व्यवसायाचा टप्पा पुर्ण करुन उत्तम कामकाज केले आहे. आर्थिक वर्ष अखेर संस्थेच्या ठेवी १२९६ कोटी रुपये झाल्या आहेत. तर संस्थेने ९८० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची अन्य बँकातील गुंतवणूक ५०५ कोटी रुपये अशी भक्कम आहे. संस्थेचा स्वनिधी १.५४ कोटी रुपयाचा आहे.
आर्थिक वर्षाअखेर संस्थेचे खेळते भांडवल १५८० कोटी रुपयाचे आहे. आर्थिक वर्ष अखेर संस्थेची सभासद संख्या ६९७२७ इतकी असून संस्थेकडे ५९ कोटी रुपयाचे भागभांडवल जमा आहे. ढोबळ नफयातून ४ कोटी रुपयाच्या विविध तरतुदी करण्यात आल्या. तरतुदीनंतर संस्थेकडे १६ कोटी २१ लाखाचा निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे. निव्वळ नफयातून निधीसाठी विविध तरतुद होवून संस्थेचा स्वनिधी भक्कम होईल अशी माहिती चेअरमन चोपडे यांनी दिली.
आर्थिक वर्षात सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी चांगले सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे व्हा. चेअरमन, संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी, सेवक यांचे चांगले योगदान मिळाले त्यामुळे संस्थेच्या कामकाजात आवश्यक सुधारणा करता आल्याचे चेअरमन चोपडे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. एस. पी. मगदूम व संचालक मंडळ सदस्य आणि सेवक उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.