रिक्षाचालकांना मराठी सक्ती केल्यानंतर बिष्णोई गँगची थेट RTO अधिकाऱ्याला धमकी
मीरा भायंदर : खरा पंचनामा
मुंबईत रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या हालचाली सुरु असताना आता लॉरेन्स बिष्णोई गँग अमराठी भाषिकांच्या बाजूने मैदानात उतरली आहे. लॉरेन्स बिष्णोई गँग मिरा भाईंदरमधील वाहतूक विभागाचे (RTO) मराठी अधिकारी नलावडे यांना धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य केल्यामुळे बिष्णोई गँगने ही धमकी दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याप्रकरणी आता परिवहन विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची पक्रिया सुरु आहे. मिरा भाईंदरमधील मराठी विरुद्ध अमराठी वादात आता लॉरेन्स बिश्नोई गँगने उडी घेतल्याने हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
अलीकडेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात येईल, असे वक्तव्य केले होते. रिक्षाचालकांना मराठी भाषा येत नसेल तर त्यांचे परमिट काढून घेतले जातील, असेही त्यांनी म्हटले. यानंतर पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आला होता. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील हिंदी भाषिक विभागाचे प्रमुख मनीष दुबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माझं महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांना निवेदन आहे की, त्यांनी एक आदेश जारी केला आहे. असा आदेश काढण्यापूर्वी त्यांनी विचार केला पाहिजे होता की, रिक्षाचालक हा मुंबईतील वाहतुकीचा कणा आहेत. आपल्या पैशाने परमिट घेऊन, कर्ज काढून रिक्षा चालवतात आणि मुंबईतील लाखो प्रवाशांना सुविधा पुरवतात. अशा ठिकाणी तुम्ही भाषिक वाद आणत असाल तर ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नसल्याचा इशारा मनीष दुबे यांनी दिला.
रिक्षाच्या परमिटसाठी मराठी भाषा सक्तीचा केली तर तुम्हाला किती मराठीचे शिकवणी वर्ग सुरु करावे लागतील. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून लोकांना मराठी शिकवण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला असा आदेश काढायचाच असेल तर रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी सहा महिने ते एक वर्षाचा वेळ द्या. 1 एप्रिल 2027 पूर्वी मराठी आली नाही तर तुमचं परमिट रद्द होईल, असा आदेश असेल तर आम्ही त्याला समर्थन देऊ. पण एका महिन्याची वेळ देऊन असा आदेश जारी केला तर तो आम्हाला मान्य नाही. आम्ही त्याविरोधात आंदोलन करु, असे मनीष दुबे यांनी म्हटले. कोणतीही भाषा शिकण्याचे वय नसते. मराठी भाषा आली पाहिजे. पण त्यासाठी वेळ दिला पाहिजे, असेही दुबे यांनी म्हटले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.