Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्तव्यावर गैरहजर राहिल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित

कर्तव्यावर गैरहजर राहिल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित

पुणे : खरा पंचनामा 

शहर पोलिस नियंत्रण कक्षात कर्तव्यावर असताना, वरिष्ठांना कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहणाऱ्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली.

अभिजित प्रभाकर जाधव असे निलंबित केलेल्या सहाय्यक निरीक्षकाचे नाव आहे. पोलिस दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक निरीक्षक अभिजित जाधव यांची मागील ३१ मार्च रोजी पोलिस नियंत्रण कक्षात दुपारी चार ते रात्री बारा या वेळेत नियंत्रण कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, वरिष्ठांना पूर्वसूचना न देता ते कर्तव्यावर गैरहजर राहिले.

पोलिस नियंत्रण कक्षातून प्रत्येक लहान-मोठ्या घडामोडींवर चोवीस तास लक्ष ठेवले जाते. मात्र, जाधव यांच्या या गैरहजेरीमुळे शहरातील महत्त्वाच्या घटनांचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळेत सादर होण्यास विलंब झाला. यापूर्वीही ते पूर्वकल्पना न देता कर्तव्यावर गैरहजर राहिल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समज दिली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाधव यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.