Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचा उमेदवार जाहीर'या' नेत्यावर सुनेत्रा पवारांचा विश्वास

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचा उमेदवार जाहीर
'या' नेत्यावर सुनेत्रा पवारांचा विश्वास

मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. काल (बुधवार) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उमेदवाराच्या नावाबाबत उत्सुकता होती. अखेर विधान परिषदेची उमेदवारी झिशान सिद्दीकी यांना जाहीर केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बाबा सिद्धीकी यांची बिश्नोई गँगकडून हत्या करण्यात आली होती. तर, विधानसभा निवडणुकीत झिशान यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

या पराभवानंतर झिशान यांचे राजकीय कारकिर्द धोक्यात आली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांनी झिशान यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याबाबत मोठी स्पर्धा होती. तब्बल 80 नेत्यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती. मात्र, पाच नावे ही अंतिम करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार पार्थ पवार यांनी देखील विक्रम काकडे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मांत्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत झिशान यांच्या नावावर एकमत झाले.

महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत चांगली कामगिरी करता आली नाही. झिशान सिद्दीकी हे माजी आमदार आहेत. बॉलिवूडमध्ये देखील त्यांचे कनेक्शन आहे. उच्चभ्रू वर्गात सिद्दीकी यांच्या नावाला पसंती आहे. या सर्व बाजुंचा विचार करत मुंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सिद्दीकी यांना उमेदवारी मिळाली असल्याची चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.