तुमच्याप्रमाणेच माझ्याही मनात शंका पण...
बारामती : खरा पंचनामा
बारामती पोटनिवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आज बारामती येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांनी पहिल्यांदा अजित पवार विमान अपघाताबाबत बोलत अपघाताबाबत माझ्या मनात देखील शंका असून सर्व शंकांचं निरसन व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे.
या सभेत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दादांच्या अपघाताविषयी तुमच्याप्रमाणेच माझ्याही मनात शंका आहे. दादांच्या अपघाताबाबतच्या सर्व शंकांचे निरसन व्हायला पाहिजे. अपघाताच्या चौकशीबाबत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. अपघाताबाबत विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरु आहे असं या सभेत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या.
पुढे या सभेत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह या निवडणुकीत सर्व पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार. शरद पवारांचे आशीर्वाद अत्यंत मोलाचे आहे असं देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या. दादांच्या आठवणीत अजूनही बारामतीकर शोकाकुल आहे. अनेक जण म्हणत आहे दादा परत येतील मात्र आज दादा आपल्यात नाही हे कटु सत्य आहे. दादांचे कार्य आणि त्यांचे स्वप्न आपल्याला पुढे घेऊन जावे लागणार आहे. सत्ता असो किंवा नसो दादांनी नेहमी जनतेसाठी काम करत बारामती तालुक्याला राज्यात नंबर एकच तालुका करण्यासाठी प्रयत्न केले. दादांनी समाजासाठी काम करत असताना जात-पात, धर्म कधीच बघितला नाही. अनेक चढ उतार येऊनही अजितदादा कधीही खचले नाही.
बारामतीकरांच्या मनात दादांविषयी प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. दादांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. दादा गेले पण त्यांची स्वप्नं अजूनही जीवंत आहे असं देखील या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. तसेच जनसेवेसाठी दादांच्या पावलावर पाऊल ठेऊन मी उभी आहे अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली.
मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. येसुबाई जशा लढल्या तशीच मी लढणार आहे. दादांचे जीवलग मित्र म्हणून फडणवीसांचं बारामतीशी नातं आहे. अजितदादांच्या अपघाताबाबात जे तुमच्या मनात शंका आहेत ते माझ्या मनात देखील आहे. विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरु आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.