शिर्डीत 'भोंदू' खरातचे आरटीओ कनेक्शन!
दोन बड्या अधिकाऱ्यांचं नाव समोर
अहिल्यानगर : खरा पंचनामा
शिर्डी येथील बहुचर्चित आर्थिक फसवणूक आणि सावकारकीच्या गुन्ह्यात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. भोंदू बाबा अशोक खरात याच्या माध्यमातून सुरू असलेल्या समता पतसंस्थेतील गैरव्यवहाराचे धागेदोरे आता थेट सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचले आहेत.
या प्रकरणात परिवहन विभागाच्या दोन बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शिर्डी पोलीस आता या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करणार आहेत.
अशोक खरात या भोंदू बाबाने आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अनेकांना ओढल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता या गुन्ह्यात परिवहन विभागाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. समता पतसंस्थेत उघडण्यात आलेल्या 100 हून अधिक संशयास्पद खात्यांची तपासणी करताना पोलिसांना या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची कागदपत्रे आढळली आहेत. या माहितीमुळे शिर्डी पोलिसांच्या तपासाला आता एक वेगळीच दिशा मिळाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित दोन अधिकाऱ्यांच्या नावे पतसंस्थेत खाती उघडण्यात आली आहेत. मात्र, ही खाती संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःहून उघडली आहेत की त्यांची कागदपत्रे वापरून अशोक खरातने बनावट खाती तयार केली, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. जर ही खाती बनावट असतील तर या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची वैयक्तिक कागदपत्रे एका भोंदू बाबापर्यंत पोहोचली कशी? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
केवळ अधिकारीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावेही या पतसंस्थेत व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून सध्या 56 व्यक्तींच्या मालकीच्या 100 हून अधिक बँक खात्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्यात आला असावा किंवा सावकारकीचे व्यवहार या खात्यांतून झाले असावेत, असा संशय पोलिसांना आहे.
शिर्डी पोलीस सध्या अनेक जणांचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. लवकरच या दोन्ही परिवहन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. या चौकशीतून आरटीओ विभागातील आणखी काही जणांची नावे बाहेर येतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या पोलीस अकादमी येथे ईडी पथक दाखल झाले आहे. याच ठिकाणी SIT कडून सुरू आहे भोंदू खरात याची चौकशी सुरू आहे. खरातच्या मालमत्तांची देखील ईडी चौकशी करणार आहे. खरात विरोधात ईडी कडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरातच्या मालमत्तांच्या कागदपत्रांची ईडी कडून होणार तपासणी आहे. तपास यंत्रणांकडून खरातच्या मालमत्तांचा सविस्तर अहवाल बनविण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.