मेट्रो उद्घाटन सोहळ्यात पोलिसांनी महापौरांना अडवलं; गोंधळाचे वातावरण निर्माण
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित असणाऱ्या मेट्रो ९ आणि मेट्रो २बी मार्गाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे मुंबईकर अनेक महिन्यांपासून वाट पाहत असणाऱ्या मेट्रो प्रवाशांच्या सेवेत उतरणार आहेत. यामुळे नागरिकांचा प्रवास अधिकच सुसाट आणि आरामदायी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंगळवार (ता. ७) रोजी या दोन मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात मुंबईचे महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा गाजावाजा सुरु असताना याठिकाणी एक अनपेक्षित प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
मुंबई महापालिकेचे महापौर रितू तावडे या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाला जात असताना पोलिसांनी त्यांना अडवल्याचे समोर आले आहे. मेट्रो 9 अंतर्गत दहिसर ते काशिगाव या मेट्रो मार्गाच्या उद्घाटन सोहळ्याला महापौर रितू तावडे जात असताना त्यांना पोलिसांनी पुढे जाऊ दिले नाही. यावेळी त्यांना गेटवरच अडवण्यात आले. महापौरांना अडवण्यात येत असल्याचं लक्षात येताच स्थानिक नगरसेवक खणकर यांनी पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे काहीवेळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले
दरम्यान, आता या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पोलिसांकडून अडवण्यात आल्यामुळे स्थानिक नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबई मेट्रोच्या कार्यक्रमाला जाताना घडलेल्या प्रकारामुळे गोंधळ उडाला. परंतु यावेळी महापौरांनीही पोलिसांशी संवाद साधत गोंधळ कमी करण्यात आला. या प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.