अशोक खरातच्या जीवाला धोका?
सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांचा खळबळजनक दावा
नाशिक : खरा पंचनामा
महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि जादूटोणा अशा गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेला भोंदू अशोक खरात याला आज सहाव्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर नाशिक न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.
न्यायालयीन कोठडीत (जेलमध्ये) ठेवणे धोक्याचे ठरू शकते. सुरक्षेच्या कारणास्तव आणि तपासातील सातत्य राखण्यासाठी त्याला आजच पुढील गुन्ह्यासाठी ताब्यात मिळावे, अशी विनंती करण्यात आली.
न्यायालयाने अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु, त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची मालिका मोठी असल्याने, विशेष तपास पथक (SIT) आजच त्याला सातव्या गुन्ह्यासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा आपल्या ताब्यात घेणार आहे. यासाठी तपास यंत्रणेने न्यायालयात रीतसर अर्ज सादर केला आहे.
सुनावणी दरम्यान, न्यायमूर्तीनी अशोक खरातला "तुझी पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का?" अशी विचारणा केली. त्यावर खरातने "नाही" असे उत्तर दिले. खरातवर आतापर्यंत अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, दररोज नवनवीन पुरावे समोर येत आहेत. आजच पुन्हा त्याचा ताबा तपास यंत्रणा घेणार असून पुढील तपासात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.