भाजपा प्रवेश नडला? राघव चड्डांना २४ तासांत १० लाख जणांनी केलं अनफॉलो
दिल्ली : खरा पंचनामा
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. राघव चड्डा यांच्यासह आपच्या राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांचा एक गट शुक्रवारी भाजपामध्ये सामील झाला आहे. मात्र या राजकीय घडामोडीनंतर चड्डा यांच्या लोकप्रियतेला चांगलाच फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
राघव चड्डा हे आम आदमी पार्टीच्या सहा राज्यसभा खासदारांनाही भाजपामध्ये घेऊन गेले आहेत. काही आठवड्यांपूर्वीच चड्डा यांची 'आप'च्या राज्यसभा उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर चड्डा भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती, मात्र त्यांचा हा निर्णय जेन-झींना फारसा आवडल्याचे दिसत नाहीये.
आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडियावरील फॉलोअर्स हे बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीची लोकप्रियता मोजण्याचे एक साधन मानले जाते. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या २४ तासांत चड्डा यांचे इन्स्टाग्रामवर जवळपास १० लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. ३७ वर्षीय राज्यसभा खासदार चड्डा यांचे शुक्रवारी १४.६ मिलीयन फॉलोअर्स होते. शनिवारी दुपासी एक वाजता त्यांच्या फॉलोअर्सची संख्या घटून १३.५ मिलीयन इतकी झाली आहे. इंडिय टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल जेन-झी 'अनफॉलो' मोहिमेमुळे राघव चड्डा यांचे १० लाख फॉलोअर्स २४ तासांत कमी झाले आहेत,' असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते अनिश गावंडे यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. 'इंटरनेट तुम्हाला एका रात्रीत हिरो बनवू शकते, तर हेच इंटरनेट तुम्हाला एका रात्रीत झिरो बनवू शकते,' असेही ते पुढे म्हणाले.
इतकेच नाही तर, राघव चड्ढा यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही अनेक जण अनफॉलो करण्याबाबत कमेंट्स करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.