Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस निरीक्षकाने रस्त्यावर मारहाण करून विनयभंग केला अधिकाऱ्याच्या पत्नीचा गंभीर आरोप

पोलीस निरीक्षकाने रस्त्यावर मारहाण करून विनयभंग केला 
अधिकाऱ्याच्या पत्नीचा गंभीर आरोप

अकोला : खरा पंचनामा 

अमरावती येथील एका पोलीस निरीक्षकाने पत्नीला रस्त्यावर मारहाण करून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. या प्रकरणी पत्नीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पती दुसऱ्या महिलेसोबत असल्याचे कळताच पत्नीने जाब विचारल्यावर हा वाद झाला. याची चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे व पोलीस निरीक्षकाशी २०१३ मध्ये लग्न झाले. मात्र, लग्नानंतरपासूनच पैशासाठी छळ व मारहाण सुरू असल्याचा आरोप तिने केला. या छळाला कंटाळून २०१४ मध्ये सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या प्रकरणी भादंवि कलम ४९८अ अंतर्गत न्यायालयात खटला प्रलंबित असल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान, पती दुसऱ्या महिलेसोबत विवाह करून तिच्यासोबत राहत असल्याची माहिती पत्नीला मिळाली. संबंधित महिला अकोल्यातील एका लग्न समारंभात येणार असल्याची माहिती मिळताच पत्नी आपल्या बहिणीसह तेथे पोहोचली. यावेळी पती हे एका महिलेसोबत तसेच कुटुंबीयांसह बाहेर येताना दिसल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत विचारणा करताच संबंधित महिला, सासू व इतरांनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर पतीने पत्नीचे केस पकडून तिला रस्त्यावर ओढत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. विनयभंग केल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, बहीण मदतीसाठी धावून आली असता तिच्याही अंगावर हात घालत मारहाण व विनयभंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात केला. डाबकी रोडवरील साहू मंगल कार्यालयासमोर हा प्रकार घडला.

या संपूर्ण घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, स्वतः पोलीस निरीक्षकावरच अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

या संपूर्ण घटनेच्या काही चित्रफित समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्या आहेत. संबंधित चित्रफितीमध्ये पती व त्यांची आई फिर्यादी महिलेला रस्त्यावर ओढताना स्पष्टपणे दिसून येत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली असून सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.