Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नारी शक्ती' वर चर्चा सुरु असताना निशिकांत दुबेंनी घेतलं आदित्य ठाकरेंचं नाव! अरविंद सावंत, सुप्रिया सुळे संतापले

नारी शक्ती' वर चर्चा सुरु असताना निशिकांत दुबेंनी घेतलं आदित्य ठाकरेंचं नाव! 
अरविंद सावंत, सुप्रिया सुळे संतापले

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

नारीशक्ती वंदन अधिनियम आणि घटना दुरुस्ती विधेयकावर संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा सुरु असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतल्यानं जोरदार खडागंजी झाली. यावेळी ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दुबेंच्या विधानावर जोरादर आक्षेप घेतला आणि त्यांच्यावर तात्काल कारवाई करण्याची मागणी लाऊन धरली.

लोकसभेत नारीशक्ती वदंन अधिनियमावर चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण पार पडलं. त्यानंतर लगेचच ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत यांना बोलण्याची संधी दिली गेली. सावंत बोलत असताना त्यांनी हे विधेयक आणण्यामागे भाजपच्या हेतूवर शंका उपस्थित केली. पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरी या पाच राज्यात निवडणूक असल्यानं सरकारनं हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. म्हणजेच सरकारला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, मतं मिळवण्यासाठी हे मंजूर करायचं आहे, असा सणसणीत आरोप केला. त्यानंतर त्यांनी भाजपचे माजी खासदार कुलदीप सिंह सेनगर, ब्रिजभूषण शरण सिंह या महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींची नावं घेतली आणि सरकारला महिलांच्या कल्याणाचं काहीही पडलेलं नाही असा आरोप केला.

दरम्यान, अरविंद सावत यांचं भाषण सुरु असतानाच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी जागेवर उठून उभं राहतं, थेट आदित्य ठाकरेंचं नाव घेत त्यांनी एका हिरॉईनचा जीव घेतला असल्याचं म्हटलं. त्यांच्या या विधानामुळं अरविंद सावंत चांगलेच भडकले आणि इथं विनाकारण आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये, असं ठणकावलं. दरम्यान, सावंत आणि सुप्रीया सुळे यांनी अशा प्रकारे नावं घेणं चुकूचं असल्याच म्हटलं. यामुळं एकच गदारोळ सुरु झाला, तुम्ही आदित्य ठाकरेंचा नाव कसं का घेता? असा सवाल करत निशिकांत दुबेंवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.