कुपवाडमध्ये मोफत नेत्र व मधुमेह नेत्रपटल तपासणी शिबिरास प्रतिसाद : ८८ जणांनी घेतला लाभ
कुपवाड : खरा पंचनामा
कुपवाडमध्ये स्व. डॉ. जे. व्ही. शेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून गुरुवारी आयुष सेवाभावी संस्था व डॉ. जे. व्ही. शेट्टी परिवार यांच्या वतीने तसेच रोटरी क्लब आणि सुदर्शन आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी नेत्रपटल तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरात ८८ जणांनी लाभ घेतला. यापैकी 19 मोतीबिंदू असलेले रुग्ण आढळले. त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिराचे उद्घाटन उपमहापौर गजानन मगदूम यांच्याहस्ते व डॉ.सुभाष पाटील, प्रा.बसवराज हिरेमठ, अण्णासाहेब उपाध्ये, आयुष संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष महावीर पाटील, डॉ.शुभांगी भरणकर, अभिजित पेंडुरकर, अविनाश पवार, सुरज शेख, निहाल मुजावर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
रोटरी क्लब आणि सुदर्शन आय हॉस्पिटल यांची अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेली मोबाईल व्हॅन या ठिकाणी उपलब्ध होती. याद्वारे रुग्णांची जागेवरच अचूक तपासणी करण्यात आली. ज्या व्यक्तींना मागील ५ ते १० वर्षांपासून किंवा अधिक काळापासून मधुमेहाचा त्रास आहे, अशा रुग्णांच्या डोळ्यांच्या पडद्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा मधुमेह रुग्णांनीही या शिबिराचा लाभ घेतला.
स्वागत जयराज शेट्टी, प्रास्ताविक ज्योती शेट्टी यांनी केले. आभार श्रीमती जयश्री शेट्टी यांनी मानले. यावेळी डॉ. पूनम उपाध्ये, भूषण पाटील, किरण पाटील, सतीश पाटील यासह भागातील नागरिक उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.