Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला सुरुवात!पदोन्नतीसह बदल्यांकडे इच्छुकांचे डोळे

राज्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला सुरुवात!
पदोन्नतीसह बदल्यांकडे इच्छुकांचे डोळे 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यात सध्या पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे वारे वाहत असून गृहमंत्रालयाच्या या सकारात्मक निर्णयामुळे राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे. शेकडो पोलिस अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली होती. मात्र, आता पदोन्नतीची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे राज्य पोलिस दलात सकारात्मक वातावरण आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून राज्य पोलिस सेवा (रापोसे) दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. पदोन्नत्या रखडल्यामुळे पोलिस दलात नाराजीचा सूर होता. तसेच पदोन्नतीची यादी लवकरच पडेल, या आशेने कनिष्ठ पदावर काम करताना पाहिजे तेवढे गांभीर्य राहत नव्हते. पदोन्नती झाल्याने बदली होणार आणि पुन्हा नव्या शहरात बढतीच्या पदावर काम करावे लागणार, या आशेने अधिकारी कर्तव्य बजावत होते. मात्र, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवून राज्य पोलिस दलातील पदोन्नतीला हिरवा कंदील दाखवला. 

पदोन्नतीस गृहमंत्रालयाकडून कोणतीही अडचण नसल्याचे दर्शविताच पदोन्नत्याच्या हालचाली सुरु झाल्या. पोलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभागातील लिपिक वर्गामध्ये योग्य तो समन्वय नसल्यामुळे पदोन्नत्यांना उशिर होत होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा पदोन्नत्याचे वारे वाहू लागले आहे. नुकताच राज्यातील 403 पोलिस हवालदारांना थेट पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच तब्बल 201 सहायक पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देऊन पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली. आता पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची यादीसुद्धा लवकरच लागणार असल्याची माहिती मुंबईतील यादीसुद्धा लवकरच लागणार असल्याची माहिती मुंबईतील सूत्रांकडून मिळाली आहे.

गेल्या 3 डिसेंबर रोजी राज्यातील 448 पोलिस निरीक्षकांची सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपाधीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी यादी प्रकाशित करण्यात आली होती. पोलिस निरीक्षकांना 15 डिसेंबरपर्यंत माहिती मागविण्यात आली होती. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीची यादी रखडली होती. मात्र, आता लवकरच एसीपी-डीवायएसपी पदावर पदोन्नतीसाठी महसूल संवर्ग मागविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

गेल्या डिसेंबर ते 12 एप्रिल या कालावधीत काही पोलिस निरीक्षक सेवाजेष्ठतेनुसार आणि वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांची नावे एसीपी-डीवायएसपी पदावर पदोन्नतीच्या यादीत समाविष्ठ होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांत पदोन्नतीच्या हालचाली न झाल्यामुळे अनेक पोलिस निरीक्षकांच्या नशिबी उपेक्षा आली. अनेक जणांवर पदोन्नतीविनाच सेवानिवृत्तीची पाळी आली. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच ! 
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त ते पोलिस आयुक्त दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांचा बदलींमध्ये समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.