Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जनगणना कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक? केंद्राचा आदेशमहाराष्ट्रात पोलीस प्रशासनातील बदल्या रखडणार?

जनगणना कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक? केंद्राचा आदेश
महाराष्ट्रात पोलीस प्रशासनातील बदल्या रखडणार?

मुंबई : खरा पंचनामा 

जनगणना हे देशातील अत्यंत महत्त्वाचे प्रशासकीय काम मानले जाते. त्यामुळे या कामात सहभागी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना काही विशेष सवलती दिल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वाची सवलत म्हणजे बदली मधून सूट.

जनगणनेचे काम होईपर्यंत या सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली करु नये, असे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले. यामुळे पोलीस प्रशासनातील बदल्या रखडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या पत्राच्या अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करणार का? संबधीत कर्मचाऱ्यांना चालू वर्षांत होणाऱ्या बदल्यांतून सुट मिळणार का? महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत सध्या प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरु असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान होणार आहे. यात घरगणना होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणना होणार आहे. याच कालावधीतच जनगणना अधिकाऱ्यांची नियुक्ती व प्रशिक्षण प्रक्रिया बहुतांश राज्यात सुरू झाली असून महाराष्ट्रातही याबाबत प्रक्रिया सुरु झाली आहे.

जनगणना कार्यक्रमांसाठी नियुक्ती झाल्यानंतर हे काम पूर्ण झाल्याशिवाय या कर्मचारी, अधिकाऱ्यांची बदली करु नये, असे गृहसचिवांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या पत्रामुळे संभ्रम पसरला आहे. यामुळे बदल्या आणि पदोन्नती रखडणार हे स्पष्ट झाले आहे. एकदा नियुक्त झाल्यानंतर जनगणना पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांची ३१ मार्च २०२७ पर्यंत बदली करू नये, असे निर्देश गृह सचिवांनी दिले आहेत.

मात्र, महाराष्ट्रात याबाबत स्वतंत्रपणे कोणताही शासन निर्णय (GR) जाहीर झालेला नसल्याची माहिती समोर येत आहे. तरीही केंद्राच्या निर्देशांमुळे राज्यातही याची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे शिक्षक, ग्रामसेवक, महसूल विभागातील कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर जनगणना कामात सहभागी होतात. त्यामुळे या निर्णयाचा परिणाम मोठ्या कर्मचाऱ्यांच्या वर्गावर होणार आहे.

जनगणनेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना (शिक्षक, ग्रामसेवक, लिपिक इ.) जनगणना पूर्ण होईपर्यंत बदली केली जात नाही किंवा त्यांच्या बदलीवर तात्पुरती स्थगिती दिली जाते.

ही सवलत कोणाला लागू होते?
जनगणना अधिकारी (Census Officers), गणनाकर्मी / एनवरेटर्स, पर्यवेक्षक (Supervisors), शिक्षक, ग्रामसेवक, महसूल व स्थानिक प्रशासन कर्मचारी

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.