आधी महिलेने गिरीश महाजनांना सुनावलं, आता जन आक्रोश रॅलीच्या आयोजकावर गुन्हा
मुंबई : खरा पंचनामा
महिला आरक्षण विधेयकावरुन वरळी येथे भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या रॅलीच्या आयोजकाविरुद्ध वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्याचा या आयोजकावर आरोप आहे.
दरम्यान या रॅलीमुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता, याबाबत सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जाते.
नारी शक्ती वंदन अधिनियमावरुन सध्या भाजपा आणि विरोधकांमध्ये प्रचंड वाद सुरु आहे. त्यात संसदेत हा विधेयक मंजूर न झाल्याने भाजपाच्या वतीने देशभरात आंदोलन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाच्या वतीने मंगळवारी वरळी येथे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी वरळी पोलिसांकडून रितसर परवानगी घेण्यात आली होती. काही अटी आणि शर्थीनी ही परवानगी पोलिसांकडून देण्यात आली होती.
रॅलीत पंधरा ते वीस हजाराहून महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे तेथील वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्याचा मुंबईकरांना नाहक त्रास सोसावा लागला होता. या रॅलीबाबत एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारुन आपला संताप व्यक्त केला होता. इतकेच नव्हे तर गिरीश महाजन यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले होते.
'इथून चालते व्हा, तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही रॅली मोकळ्या मैदानात का आयोजित केली नाही,' असे अनेक प्रश्न विचारले होते. तिचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. त्यात आयोजकांनी मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे रॅलीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांविरुद्ध वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या आयोजकांची लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.