Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस निरीक्षकाने चक्क आपल्याच ट्रॅफिक हवालदाराला दंड ठोठावला

पोलीस निरीक्षकाने चक्क आपल्याच ट्रॅफिक हवालदाराला दंड ठोठावला

केज : खरा पंचनामा 

दुचाकीवर प्रवास करताना स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक शासकीय व निमशासकीय कर्मचारी सुद्धा हेल्मेट वापर करीत नसल्याने केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उनवणे यांनी वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार यांना एक हजाराचा दंड ठोठावला.

रस्ते अपघातात दुचाकी स्वारांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने दुचाकी स्वार आणि पाठीमागे बसलेला या दोघानीही हेल्मेट घालणें अनिवार्य आहे. त्या संदर्भात त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

सोमवारी (दि. २०) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे हे पोलिस ठाण्याच्या आवारात असताना त्याच वेळी वाहतूक शाखेचे हवालदार हे विना हेल्मेटचे मोटार सायकलवर येत असल्याचे दिसताच स्वामील उणवणे यांनी त्यांना एक हजारा चा ऑनलाईन दंड देऊन त्याचे ई चालान फाडले.

भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असून, हेल्मेट न वापरणे हे दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार, दरवर्षी ५०,००० हून अधिक दुचाकीस्वारांचा जीव जातो, ज्यामध्ये बहुतेकजण हेल्मेट वापरत नाहीत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.