अंजनगावातील शिवरायांचा पुतळा वादावर अखेर तोडगा, राजन पाटील यांची शिष्टाई फळाला
माढा : खरा पंचनामा
अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवर अखेर तोडगा निघालाय. पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थान ची असल्याचे पुढे आले.
याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची मध्यस्थी बैठक यशस्वी ठरली आहे. या बैठकीत दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी पुतळ्याच्या जागेबाबत सहमती दर्शवली आहे. तसेच पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची असल्याने शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजाने देखील मान्यता दिली. त्यामुळे अंजनगाव तणाव मुक्त झाले आहे. विशेष म्हणजे या सगळ्यांमध्ये आंदोलन संपले आणि अंजन गावातील दोन्ही गटातील आंदोलक लोक हे रात्रीच घरी गेल्याचे दिसून आले. सध्या अंजन गावात कुठलेही आंदोलन नसून पोलिसांचा मात्र बंदोबस्त आहे. अशातच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी या प्रकरणावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, आज दिवसभरात अंजनगाव येथे दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत स्थलांतरित करण्यासाठी पुतळ्याच्या जागेची पाहणी होईल. आणि यानंतरच पुतळा स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
माढा तालुक्यातील अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादाच्यापार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर करण्यासाठी जागा निश्चित झाली आहे. ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आलाय त्याच्याच समोरच्या बाजूला पुतळा स्थलांतर करण्यात येईल, अशीमाहिती माजी आमदार राजन पाटील यांनी एबीपी माझाला दिलीआहे. अंजनगावातील पुतळ्याचा वाद मिटल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि माजी आमदार राजन पाटील गावात दाखल झाले. यावेळी पोलीस अधिक्षक, राजन पाटील आणि मराठा समाजातील काही प्रतिनिधींच्या उपस्थितीत जागेची पाहणी करण्यातआली. जागेची पाहणी करताना देखील गावात प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ग्रामस्थ व्यतिरिक्त बाहेरील इतर व्यक्तींना गावात प्रवेश दिला जातं नाहीये. तरदुसरीकडे माढ्यातील अंजनगावातील मंदिराचे पुजारी फरांडे महाराजांचे देखील आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. मध्यरात्री 3 वाजता फरांडे महाराजांनी पाणी पिऊन आंदोलन मागे घेतले आहे.
मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी मला मध्यस्ती करून तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मी दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. काल (शुक्रवार) रात्रीच्या बैठकीत स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे देखील उपस्थित होते. शासकीय जागेची पाहणी करून पुतळा स्थलांतर करण्याचा निर्णय झालेला होता. त्यानुसार आम्ही जागेची पाहणी केली असून जागा निश्चित केलीय. पुतळा स्थलांतर करता येईल, अशा पद्धतीने चबूतरा बांधल्यानंतर पुतळा स्थलांतर केला जाईल. तसेच दोनच दिवसात सुशोभीकरणसाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा देखील पालकमंत्र्यांनी केलीय अशीमाहिती, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनीदिली आहे. दरम्यान जो निर्णय सध्या झालाय त्यावर गावातील सर्व समाज समाधानी असल्याची भावना सरपंच प्रदीप चौगुले यांनी व्यक्त केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.