Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बेपत्ता निवृत्त पोलिस अधिकारी घुगेचा विहिरीत मृतदेह सापडला; आत्महत्येचा संशय

बेपत्ता निवृत्त पोलिस अधिकारी घुगेचा विहिरीत मृतदेह सापडला; आत्महत्येचा संशय

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

छत्रपती संभाजीनगर येथील बाळापूर शिवारात बेपत्ता झालेल्या सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक भीमराव कारभारी घुगे (६२) यांचा मृतदेह कोरड्या विहिरीत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घुगे हे शहर पोलिस दलातून उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. सेवेच्या अखेरीस ते क्रांती चौक पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते कधी बीड बायपासवरील मुलाकडे, तर कधी बाळापूर शिवारातील घरी राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, घुगे हे मुलीला भेटण्यासाठी बाळापूर परिसरात गेले होते. त्यानंतर ते शहराकडे निघाले, मात्र अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कॉल किंवा संदेशांना प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, बाळापूर शिवारातील एका कोरड्या विहिरीत व्यक्ती पडल्याची माहिती चिकलठाणा पोलिस यांना मिळाली. घटनास्थळी तपास केला असता, तो मृतदेह घुगे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

घटनास्थळी त्यांची दुचाकी विहिरीपासून काही अंतरावर आढळून आली. तसेच दुचाकीच्या डिक्कीत दोरीही सापडल्याने आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.