Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयपीएस निखिल पिंगळे यांनी सातारा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारलाकायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देण्याची ग्वाही

आयपीएस निखिल पिंगळे यांनी सातारा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला
कायदा आणि सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य देण्याची ग्वाही 

सौ. अनुजा  कारखेले-देवरे
सातारा : खरा पंचनामा 

सातारा जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी मावळते पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून आज बुधवारी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले चुकीला माफी नाही कायदा आणि सुव्यवस्था राखणे हेच आमचे पहिले कर्तव्य असेल. 

निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रण वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. सर्वसामान्य नागरिकांशी सुसंवाद ठेवून काम करण्यावर भर दिला जाणार आहे. महिला सुरक्षा सायबर गुन्हे आणि संघटित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही असा सूचक इशाराही दिला आहे. 

सातारा जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे देखील पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांच्या काळातही अनेक मोठमोठे गुन्हे उघडकीस आणून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले होते. त्यांची आता साताऱ्याहून सांगली पोलीस अधीक्षक म्हणून नव्याने बदली झाली आहे. यावेळी नव्याने आलेले पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे त्यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. तर तुषार दोशी हे जिल्हा परिषद निवडणुकीपासून बदलीच्या चर्चेत होते. मात्र सांगली पोलीस अधीक्षक ही बदली त्यांच्यासाठी बक्षीस बदली म्हणण्यात काही वावगे ठरणार नाही. मात्र सातारा जिल्ह्यातील सर्वच पत्रकार बांधवांसह माझ्या अधिकाऱ्यांचेही मला चांगलेच सहकार्य मिळाले त्यामुळे मी साताऱ्यातून चांगल्या कामाची पोचपावती घेवुन जात आहे असेही मावळते पोलीस तुषार दोशींनी स्पष्ट केले आहे. मात्र सांगली पोलीस अधीक्षक जात असून तेथीलही गुन्हेगारी नक्कीच मोडीत काढणार आहे असेही दोशी यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.