Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील १३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

राज्यातील १३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

मुंबई : खरा पंचनामा 

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्यातील १० ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयानंतर गुरूवारी रात्री उशीरा पुन्हा १३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय जारी करण्यात आले आहे.

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी वा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यात दोनदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले.

कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली कोल्हापूर जिल्हा परिषदेचे एस कार्तिकेयन यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली
कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ राजेंद्र भारुड यांची बदली
डॉ जसमीन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली
डॉ विजय राठोड यांची कोल्हापूरच्या नूतन जिल्हाधिकारी म्हणून बदली
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारीपदी बदली
चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून नागपूर मनपातील अतिरिक्त आयुक्त वस्तुमना पंत यांची बदली
गोंदिया जिल्हाधिकारी पदावर डॉ. मंगेश गोंदवले यांची नियुक्ती
भारत बास्टेवाड यांची लातूर जिल्हाधिकारीपदी बदली
अंजली शर्मा यांची जालना महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती
मिन्नू पी.एम. यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर पदावर नियुक्ती
वर्षा लढ्ढा यांची अमरावती महानगरपालिका आयुक्तपदी बदली
संजीता मोहपात्रा यांची सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्तपदी बदली

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.