Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अशोक खरात प्रकरणा : IAS पाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी गोत्यात?

अशोक खरात प्रकरणा : IAS पाठोपाठ दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी गोत्यात?

नाशिक : खरा पंचनामा 

नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत असून, आता ईडीने अशोक खरातच्या नाड्या टाईट करण्यास सुरूवात केली आहे. राज्यात विविध ठिकाणी अशोक खरातच्या संपत्तीवर छापे टाकणं सुरू असून आता प्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे.

अशातच या प्रकरणात अनेक बड्या अधिकाऱ्यांचं नाव देखील समोर येताना दिसतंय. एका आयएएस (IAS) अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे फक्त नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालीये.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील आयएएस अधिकाऱ्यापाठोपाठ दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या, ज्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या या महिला अधिकाऱ्यांपैकी एक डीसीपी (DCP) तर दुसरी एसीपी (ACP) दर्जाची अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. या दोन महिला पोलीस अधिकारी कोण? असा सवाल देखील विचारला जातोय.

वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या या महिला अधिकाऱ्यांचे नाव खरातसोबत जोडले गेल्याने तपास यंत्रणांनी नव्या मार्गाने तपास सुरू केला आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी बाबाकडे धाव घेतली होती का? असा सवाल देखील विचारला जात आहे. अशोक खरात प्रकरणात भोंदू बाबासोबत काही आर्थिक व्यवहारही झाले का? याबाबत तपास होण्याची शक्यता असल्याने पोलीस विभागात देखील खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अशोक खरातच्या नाशिकमधील तृप्तबाला बंगल्याची झडती घेतली. या झडतीत पोलिसांना असंख्य आधार कार्ड आणि पॅनकार्ड मिळाले आहेत. या कागदपत्रांचा वापर करून अशोक खरातने बनावट बँक खाती उघडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. या प्राथमिक तपासात तब्बल 131 बनावट बँक खाती उघडल्याचे समोर आल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातची एसआयटी चौकशी सुरु आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.