Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसांना सापडली जिवंत स्फोटकांची बॅग, हाय अलर्ट जारी

पोलिसांना सापडली जिवंत स्फोटकांची बॅग, हाय अलर्ट जारी

नागपूर : खरा पंचनामा 

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आज सकाळच्या सुमारास एक थरारक घटना समोर आली. नागपूर शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या गणेश पेठ येथील डोसर भवन परिसरातील एका निवासस्थानात जिलेटिनच्या काड्या आणि जिवंत डेटोनेटर सापडले आहेत.

त्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन हादरून गेले आहे. विशेष म्हणजे ही स्फोटके जी.एस. कॉलेजचे माजी संचालक उज्ज्वल लांजेवार यांच्या घराच्या अंगणात आढळून आली आहेत.

आज सकाळी लांजेवार कुटुंबातील सदस्य अंगणात आले असता, त्यांना एक बेवारस बॅग पडलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी ती उघडून पाहिली असता त्यात स्फोटकांसारखे साहित्य दिसले. त्यांनी विलंब न लावता तातडीने नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गणेश पेठ पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळ गाठले. त्यानंतर संपूर्ण परिसर सील केला. यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) केलेल्या प्राथमिक तपासणीत १५ नग जिलेटिन कांड्या, ५८ नग डेटोनेटर आणि ८ नग कनेक्टर आढळून आले आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके एका रहिवासी भागात आणि ते ही एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरात सापडल्याने सुरक्षेचा प्रश्न सामान्यतः जिलेटिनचा वापर विहिरी खोदण्यासाठी किंवा खाणकामात केला जातो. मात्र, शहराच्या मध्यभागी अशाप्रकारे स्फोटके मिळणे हा एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकतो का, या दृष्टीने एटीएस (ATS) देखील समांतर तपास करण्याची शक्यता आहे.

तसेच 'पेसो' (PESO) आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. हे स्फोटक किती जुने आहे आणि त्याची क्षमता किती होती, याचे विश्लेषण केले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.