Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आष्ट्यात नशेसाठी ट्रेमीमाईड इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघांना अटक 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त : एलसीबीची कारवाई

आष्ट्यात नशेसाठी ट्रेमीमाईड इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघांना अटक 
1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त : एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

औषधी उपयोगासाठी असणाऱ्या ट्रेमीमाईड इंजेक्शनची नशेसाठी विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. आष्टा येथे सांगली एलसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

अभिषेक भिमराव सरवदे (वय २६, रा. शिराळकर कॉलनी, दुधगाव रोड, आष्टा) रेहान रफीक मुजावर (वय २०, रा. गोर्डे चौक, आष्टा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नशेखोरीला आळा घालण्यासाठी नशेचे पदार्थ विक्री, तस्करी, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विशेष पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना एलसीबीला दिल्या आहेत. त्यानुसार निरीक्षक झाडे यांनी उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक तयार केले होते. 

पथक आष्टा परिसरात गस्त घालत असताना दोघेजण दुचाकीवरून घाडगे मळ्यातील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून सरवदे, मुजावर यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे ट्रेमीमाईड इंजेक्शनच्या बाटल्या सापडल्या. त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्यांनी त्याची विक्री करत असल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून दुचाकी, इंजेक्शन जप्त करण्यात आली. त्यांना आष्टा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संजय पाटील, सुर्यकांत सांळुखे, अतुल माने, हणमंत लोहार, अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, प्रमोद साखरपे, चालक गणेश शिंदे, सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर, अजय पाटील, इम्रान महालकरी, अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.