Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एसआयटीकडून रुपाली चाकणकरांची 6 तास चौकशी, तेजस्वी सातपुतेंनी स्वतः दोन तास केला प्रश्नांचा भडीमार

एसआयटीकडून रुपाली चाकणकरांची 6 तास चौकशी, 
तेजस्वी सातपुतेंनी स्वतः दोन तास केला प्रश्नांचा भडीमार 

नाशिक : खरा पंचनामा 

राज्याला हादरवरुन सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज कसून चौकशी करण्यात आली, तब्बल 7 तांसापासून SIT कडून त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळे, एसआयटीने रुपाली चाकणकर यांना नेमके काय प्रश्न विचारले, नेमकं कोणत्या प्रकारची चौकशी झाली, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्यातच, चाकणकर यांनी एसआयटी पथकापासून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यापूर्वी, एसआयटीने चाकणकर यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याचे वृत्त झळकले होते. मात्र, त्यांनी नकार देत मला कुठलीही नोटीस आली नसल्याचं म्हटलं होतं. अखेर, आज त्यांना एसआयटीच्या (SIT) चौकशीला सामोरे जावे लागले.

अशोक खरात प्रकरणात एसआयटी पथकाकडून अद्यापही चौकशी सुरू असून वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी अशोक खरातची पोलीस कोठडी वाढवून घेतली आहे. त्यातच, यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची एसआयटीने चौकशी केली असून पतसंस्थेतील आर्थिक व्यवहारासंदर्भात ही चौकशी झाल्याची माहिती आहे. आता, प्रत्यक्ष रुपाली चाकणकर यांची देखील आज चौकशी झाली. त्यानंतर, त्यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.

पोलिसांना जे आवश्यक होतं त्यात मी सर्व सहकार्य केलं आहे, एसयटी तपासात मी तपास यंत्रणांसोबत सविस्तरपणे बोलेले. माझ्या चौकशी संदर्भात सविस्तर अहवाल तुमच्यापर्यंत येईल. मी सध्या पुण्याला निघाले आहे, एसआयटीपुढे समर्पक उत्तर दिली आहेत, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी अधिकचे बोलणे टाळले. मात्र, मी तपास यंत्रणांपुढे सविस्तरपणे बाजू मांडल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

अशोक खरातसोबत केव्हापासून संबंध होते, शिवनिका संस्थांवर असताना अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणाची तुम्हाला माहिती होती का? असे सवाल एसटीने चाकणकरांना केले आहेत. अशोक खरातसोबत ज्या पूजा, विधी केल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या? पूजा विधीनेच काही आर्थिक संबंध खरात सोबत जोडले होते का अशोक खरात सोबत काढलेले फोटो व्हिडिओ नेमके केव्हाचे आहे? कोणत्या कार्यक्रमातील आहे. शिवनीका संस्थांच्या बैठकांमधून कोणते कामकाज सुरू होते? अशा प्रश्नांची सरबत्ती एसआयटी पथकाने रुपाली चाकणकर यांना आजच्या बैठकीत केली.

दरम्यान, SIT पथक प्रमुख तेजस्वी सातपुते आणि रुपाली चाकणकर यांच्यात थेट दोन तासांहून अधिक चौकशी झाल्याची माहिती आहे. अशोक खरातच्या मंदिरात इतर राजकीय मंडळी येत होते ते नेमके कोणाच्या सांगण्यावरून येत होते? खरात संबंधित आर्थिक व्यवहार कोणकोणत्या बँक अकाउंटमधून झाले यासंदर्भातील चौकशी देखील रुपाली चाकणकर यांच्याकडून करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.