राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 2 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षकांसह 13 जण निलंबित
विषारी दारू प्रकरण भोवले
पुणे : खरा पंचनामा
कर्तव्यात कसूर केल्याने पुण्यात विषारी दारु पिऊन १९ नागरिकांचा बळी गेल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी ३ निरीक्षक, ६ दुय्यम निरीक्षक आणि ४ जवान अशा १३ जणांना निलंबित केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ राजेश देशमुख यांनी हा आदेश काढला आहे.
एफ विभाग पुणे निरीक्षक संदीप मोरे, दुय्यम निरीक्षक माधवी गडदरे, जवान अशोक अदमनकर आणि शिवाजी शिंदे, निरीक्षक अतुल पाटील, दुय्यम निरीक्षक योगेश चव्हाण आणि प्रविण ठाकरे, जे विभाग पुणे, दुय्यम निरीक्षक स्वप्निल कदम, जवान निलेश पवार आणि पंडित तायडे, निरीक्षक अशोक शितोळे, दुय्यम निरीक्षक हरीदास बोभाटे आणि कैलाश वाळुंजकर अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
ज्या ज्या ठिकाणी विषारी गावठी दारुचा साठा व विक्री झाल्याचे आढळून आले. त्या त्या ठिकाणच्या अधिकारी व कर्मचायांनी घटक / पथक प्रमुख या नात्याने त्यांच अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांचा सुयोग्य वापर करुन तसेच कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा नियमितपणे आढावा घेऊन कार्यक्षेत्रातील अवैध धंद्यात सामील असलेल्यांवर वारंवार गुन्हे सुद्धा नोंदविलेले नाहीत. तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा केलेली नाही. जर संबंधित अधिकारी व कमचाऱ्यांनी सराईत गुन्हगारांवर वेळोवेळी सक्त व कठोर कारवाई केली असती. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात सातत्याने गस्त घातली असती, अवैध धंदेवाल्यांची माहिती गोळा करुन वेळीच कारवाई केली असती तर अशी दुर्घटना टळली असती.
संबंधित विभागाच्या भरारी पथकातील व कार्यकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याच सकृतदर्शनी दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.