Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट ; फक्त 28 दिवसात कोर्टाचा मोठा निर्णय

नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट ; फक्त 28 दिवसात कोर्टाचा मोठा निर्णय

पुणे : खरा पंचनामा 

नसरापूर येथे एका वृद्ध नराधमाने एका चिमुरडीवर अत्याचार करून तिला जीवे मारल्याची संतापजनक घडली आहे. या घटनेनं संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली असून या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

येथील अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणातील खटल्याची विशेष न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी आरोपी भीमराव कांबळेचा गेम ओव्हर झाला आहे. आरोपी भीमराव कांबळे याच्यावर आरोपी निश्चित झाले असून फक्त 28 दिवसात पोलिसांनी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्याय मिळवून देण्याता प्रयत्न केला आहे.

फार्स्ट ट्रॅक कोर्टात पहिल्यांदाच भीमराव कांबळेला कोर्टात हजर केलं जाणार होतं. पीएम रिपोर्ट, अनेक मेडिकल चाचण्या सादर केल्या गेल्या होत्या. दोन्ही बाजूंनी जोरदार आर्युमेंट झाली पण अखेर आरोपीच्या वकिलांना कोणताही पुरावा सादर करता आला नाही. त्यामुळे आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात आरोप निश्चित केले गेले आहेत.

या महत्त्वपूर्ण सुनावणीस विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर, मूळ तक्रारदाराचे वकील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि तपास अधिकारी न्यायालयात हजर होते. आता खटल्याची रोज सुनावणी होणार असून इन कॅमेरा सुनावणी होणार आहे. पोलिसांकडून फक्त 15 दिवसात चार्टशीट दाखल करण्यात आलं होतं. चार्टशीटवर सुनावणी पार पडली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.