दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक
सात गुन्हे उघड, 5.30 लाखांच्या नऊ गाड्या जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील उत्तर शिवाजीनगर येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सात गुन्हे उघडकीस आणत 5.30 लाखांच्या नऊ गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
रणजित श्रीरंग लोखंडे (वय २४, रा. मल्हारवाडी, मंगसुळी, ता. कागवाड जि. बेळगांव)असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 17 मे रोजी उत्तर शिवाजीनगर येथे फिरोज मेस्त्री यांनी त्यांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी ती चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरट्याला पकडण्यासाठी निरीक्षक झाडे यांनी उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील अमित परीट यांना एक रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चोरलेल्या दुचाकी सांगलीतील मार्केट यार्ड येथे उभ्या केल्या असून त्यातील गाडी विक्री करण्यासाठी मार्केट यार्डजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून लोखंडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने सांगली, मिरज, कुपवाड शहरातून तसेच कर्नाटकातील कागवाड येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, अमित परिट, अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे, श्रीधर बागडी, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.