सोने खरेदी अन् विदेश यात्रा टाळा, पेट्रोल-डिझेल-गॅस जपून वापरा
पंतप्रधान मोदी यांचं मोठं आवाहन
हैदराबाद : खरा पंचनामा
इराण-अमेरिकेत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. इराण-अमेरिकेचे प्रमुख दोन्ही एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. याचा फटका जगातील सर्व देशांना बसू लागला आहे. मागील काही दिवसांत भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं भाष्य केलं आहे. एक वर्ष परदेशात यात्रा करणे टाळा, इंधनाचा वापर गरजेनुसार करा आणि एक वर्ष सोने खरेदी टाळावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी हैदराबाद दौऱ्यावर होते. या दौऱ्यातील आयोजित कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना मोठं भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी कोरोना काळाची आठवण करून दिली. त्यांनी वर्क फ्रॉम होम' पद्धतीला प्रोत्साहन देण्याविषयी सांगितलं. पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्यासही सांगितलं.
'मागील दोन महिन्यात पश्चिम आशियात युद्ध सुरू आहे. याचा परिणाम जगावर पडत आहे. युद्धाचा परिणाम भारतावरही झाला आहे. भारतात मोठे मोठे तेलाच्या विहीर नाहीत. पेट्रोल, डिझेल, गॅस या गोष्टी दुसऱ्या देशातून आयात करावे लागतात. युद्धामुळे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर, खताच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गगनाला भिडल्या आहेत, असे मोदींनी सांगितले.
'कोरोना काळात वर्क फ्रोम होम केलं. व्हिडिओ कॉन्फ्रेन्स, ऑनलाइन मीटिंग्स... सारख्या व्यवस्था विकसित केल्या. त्याची सवय देखील झाली होती. आता पुन्हा तशीच व्यवस्था सुरू करायला हवी. ती व्यवस्था देशाच्या हितासाठी पुन्हा सुरू करायला हवी. त्यास प्राधान्य द्यायला हवं, असे मोदी यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.