Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भोंदू खरात आणि रुपाली चाकणकरांचा गुवाहाटी दौराएकाच हॉटेलमध्ये मुक्काम, प्रतिभा चाकणकरही सोबत

भोंदू खरात आणि रुपाली चाकणकरांचा गुवाहाटी दौरा
एकाच हॉटेलमध्ये मुक्काम, प्रतिभा चाकणकरही सोबत

नाशिक : खरा पंचनामा 

भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. भोंदू खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे, जादुटोणा केल्याचे, अवैध पद्धतीने संपत्ती कमवल्याचे तपासात समोर आले आहे.

तपास यंत्रणांकडून खरातची कसून चौकशी केली जात आहे. अशातच भोंदू खरातचे अनेक नेत्यांसोबतही संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भोंदू खरात आणि रुपाली चाकणकर हे एकत्र गुवाहाटीला गेल्याचे समोर आले आहे. रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील त्यांच्यासोबत होत्या. या सर्वांनी गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रॅडिसन येथे तिघांनीही तीन दिवस मुक्काम केला असल्याचीही माहिती समोर आली आहे. 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 हे तीन दिवस तिघेही रेडीसन ब्लू या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. या काळात त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्जा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गुवाहाटीतील मंदिर नऊ ग्रहांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर शिवाचे मंदिर आहे. येथे विशेष पूजा अर्चा केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक खरात प्रकरणात उद्या चाकणकरांची चौकशी करण्यात येणार आहे. या आधी 10 तारखेला एसआयटीकडून रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर बोलताना चाकणकर यांनी म्हटले होते की, त्यांचे जे काही प्रश्न होते, त्या सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत. मला असा विश्वास वाटतो की, या उत्तरांमुळे सर्वांचं समाधान झालं असेल. पुढे बोलताना त्यांनी पोलिसांना या प्रकरणातील तपासामध्ये माझं जसं सहकार्य हवं असेल तसं मी सहकार्य करेल अशी माहिती दिली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.