Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य प्रशासनात पुन्हा मोठे फेरबदल! चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्य बदल्या

राज्य प्रशासनात पुन्हा मोठे फेरबदल! 
चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्य बदल्या 

मुंबई : खरा पंचनामा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार सत्तेत आल्यानंतर प्रशासनात मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरू असून, आता पुन्हा एकदा सामान्य प्रशासन विभागाने चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे मंत्रालयीन तसेच प्रशासकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

नव्या आदेशानुसार पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ग्रामीण भागाशी थेट संबंधित आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या खात्याची सूत्रे आता अनुभवी अधिकाऱ्यांच्या हाती गेल्याने आगामी काळात ग्रामविकास विभागात महत्त्वपूर्ण निर्णय आणि हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दीपक सिंगला यांची क्रीडा व युवक सेवा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांची बदली नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे.

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे महाराष्ट्र कॅडरमधील अभ्यासू आणि अनुभवी अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी नाशिक महापालिका आयुक्त, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक तसेच साखर आयुक्त म्हणून काम करताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. विशेषतः साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करताना त्यांनी प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली होती.

आता ग्रामविकास विभागाची धुरा त्यांच्या हाती आल्याने ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण, जलयुक्त शिवार 2.0, ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मिती कार्यक्रमांना अधिक गती मिळणार का, याकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.