Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री ! पुणे, सांगली, साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची एन्ट्री ! 
पुणे, सांगली, साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

पुणे : खरा पंचनामा 

एकीकडे उन्हाचे चटके लागत असतानाच दुसरीकडे राज्यातील जनतेला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुणे आणि साताऱ्यासह कोकण आणि मराठवाड्यात पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्याला पावसाचा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हवामानात बदल पाहायला मिळणार आहे. मुंबईत कमाल तापमान ३४ अंशांवर स्थिर राहणार असले, तरी आकाश ढगाळ राहील. तसेच मुंबई व आसपासच्या भागात हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, कशेळी, मुरबाड, कळवा, खारेगाव, घोडबंदर रोड आणि मुंब्रा या भागांत पहाटेपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणेकर कडाक्याच्या उन्हामुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झाले होते. आता या मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.