अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या पोलीस उपअधीक्षक पदी मंजूषा भोसले
अनुजा कारखेले-देवरे
चंद्रपूर : खरा पंचनामा
चंद्रपूर जिल्ह्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा मधुकर भोसले यांची आता अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे चंद्रपुरात अनेक वर्षांच्या कालावधीनंतर त्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.
मंजूषा भोसले यांना शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी गुन्हे प्रकटीकरण विभाग सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच दहशत विरोधी पथकांतही काम करीत आपली यशस्वीपणे कारकीर्द पार पाडली आहे. त्यांना आता अमरावती जिल्ह्यात सतत वाढत असलेला भ्रष्टाचार व त्यावर आळा घालण्यास त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. आता अमरावतीत भ्रष्टाचार करणाऱ्यावर थेट कारवाईचा इशारा नूतन पोलीस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांनी दिला आहे.
त्या लवकरच अमरावतीत आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक अरुण पाटील यांच्या सहीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जवळपास 12 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.