Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"मराठ्याकडे शाळा, कॉलेज, कारखाने आहेत म्हणून आरक्षण द्यायचं नाही का?. असा निकष आहे का? मी तुम्हाला छगन भुजबळकडे कारखाने दाखवतो. काढा त्याची जात बाहेर"

"मराठ्याकडे शाळा, कॉलेज, कारखाने आहेत म्हणून आरक्षण द्यायचं नाही का?. असा निकष आहे का? मी तुम्हाला छगन भुजबळकडे कारखाने दाखवतो. काढा त्याची जात बाहेर"

जालना : खरा पंचनामा 

"मी दादा आपल्याला हेच सांगायलया आलोय की, या गोष्टी छोट्या नाहीत. मी तुझ्याकडे का आलो? भाऊ म्हणून आलो. या गोष्टी थांबल्या असतील तर का थांबल्या आहेत? मी गंगाधरशी बोलल्यानंतर तो मला म्हणाला की, दादांच्या मनात सात-आठ विषय आहेत.

मी म्हटलं मी येऊन बोलतो" असं प्रसाद लाड म्हणाले. त्यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. "आपण या विषयातून बाजूला जाऊ शकत नाही. तुम्ही मोठ्या मनाने जीआर काढला. ओबीसी आरक्षणात काही जाती घातल्या. आंदोलन सुरु असताना 26 जाती घातल्या. आंदोलन आमचं, जाती घालता त्यांच्या, ज्या बसत नाहीत. कोण गरीब आहेत? आरक्षणाचा मागास ठरवण्याचा निकष काय?" असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

"गरीब म्हणून निकष लावला का? तसं असेल तर आम्ही तुम्हाला गरीब मराठे दाखवतो. मराठ्याला का आरक्षण द्यायचं नाही? मराठ्याकडे शाळा, कॉलेज, कारखाने आहेत म्हणून आरक्षण द्यायचं नाही का?. असा निकष आहे का? मी तुम्हाला छगन भुजबळकडे कारखाने दाखवतो. काढा त्याची जात बाहेर" असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं.

"तो निकष असेल, मराठे श्रीमंत आहेत, यांना द्यायचं नाही. यांच्याकडे साखर कारखाने, शाळा आहेत. मी छगन भुजबळचा कारखाना दाखवतो. काढा त्याची जात बाहेर?. तो तुमचा निकष असेल तर. तुम्हाला वाटत असेल मराठ्यांकडे पेट्रोल पंप आहे म्हणून आरक्षण नाही. मी तुम्हाला परळीला पेट्रोल पंप दाखवतो. काढा जात बाहेर. काय आहे तुमचा आरक्षणाचा निकष. तुम्हाला काय वाटतं हेच आम्हाला कळत नाही" असं मनोज जरांगे पाटील बोलले.

“व्यवसायावर आधारित तुम्ही आरक्षण दिलं. असा जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा नियम, निकष असेल, तर त्यांना मागास सिद्ध केलय. विदर्भातल्या मराठ्याला तुम्ही आरक्षण दिल ते शेती करतात म्हणून. व्यवसायावर आधारीत, मग आमच्याकडे समुद्र आहे का? काय निकष कळला नाही तुमचा" असं मनोज जरांगे पाटील बोलले.

त्यावर प्रसाद लाड म्हणाले की, 'दादा याच विषयावर मराठा समाज कसा मागास झाला? यावर संभागृहात माझं भाषण आहे' त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "गायकवाड कमिशन, नारायण राणे साहेबांच्या समितीने सिद्ध केलय तरी आरक्षण मिळालं नाही"

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.