NEET पेपरफुटी प्रकरण ; आरोपी डॉक्टरच आता अख्खा गेम उलटवणार?
मुंबई : खरा पंचनामा
देशभरात खळबळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' (NEET) परीक्षा पेपर लीक प्रकरणाला आता एक मोठे आणि नाट्यमय वळण मिळण्याची शक्यता आहे. पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांच्यामुळे या सगळ्या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. शिरुरे यांनी आपल्या मुलासाठी नीटचा पेपर शिवराज मोटेगावकरकडून खरेदी केल्याचा ठपका आहे.
नीट परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणी शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा गुरुनाथ मांढरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार यांना अटक झाली आहे. लातूरचे असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोर शिरुरे यांनी आपल्या मुलासाठी फुटलेला पेपर खरेदी केल्याचे समोर आले. त्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली. फुटलेला पेपर खरेदी करणाऱ्या पहिल्याच पालकाला सीबीआयने अटक केल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते.
या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. मनोज शिरूरे आता थेट केंद्रीय अन्वेषण विभागाचा (CBI) साक्षीदार होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे या रॅकेटमधील अनेक बड्या चेहऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पेशाने बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. मनोज शिरूरे यांच्यावर आपल्या मुलासाठी कोट्यवधी रुपये देऊन 'नीट'चा पेपर खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. या बेकायदेशीर व्यवहारात आणि पेपर लीकच्या साखळीत शिरूरे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. तपास यंत्रणांच्या रडारवर आल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू होती.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. शिरूरे यांचे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्याशी अत्यंत जवळचे आणि आर्थिक हितसंबंध होते. सध्या हे दोन्ही मुख्य आरोपी सीबीआयच्या कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे. या दोघांनी हे रॅकेट कसे चालवले, याचे अनेक धागेदोरे डॉ. शिरूरे यांच्याकडे असल्याचा सीबीआयला संशय आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण घोटाळ्याचे पाळेमुळे खणून काढण्यासाठी सीबीआयने आता आपली रणनीती बदलली आहे. या रॅकेटमधील मुख्य सुत्रधारांना न्यायालयात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सीबीआय आता डॉ. मनोज शिरूरे आणि त्यांच्या मुलाला या प्रकरणात थेट 'सरकारी साक्षीदार' बनवण्याच्या तयारीत आहे. शिरूरे पिता-पुत्राची साक्ष कोर्टात या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. तथापि, सीबीआयकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.