Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खाकीतली माणुसकी! जळगांवचे एसपी श्रीकांत धिवरे थेट पोलीस अंमलदारांच्या घरी, जाणून घेतल्या समस्या!

खाकीतली माणुसकी! 
जळगांवचे एसपी श्रीकांत धिवरे थेट पोलीस अंमलदारांच्या घरी, जाणून घेतल्या समस्या!

रणजित मस्के
जळगांव : खरा पंचनामा 

24 तास जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांचे घर अन् तिथेल वास्तव काय? याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी जळगांवचे एसपी श्रीकांत धिवरे यांनी शुक्रवारी थेट पोलीस वसाहतीत रात्री अचानक भेट दिली. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी केवळ चौकशीच केली नाही तर तिथल्या समस्यांचा बारकाईने निपटारा करीत पालकांची भूमिका समर्थपणे बजावली. 

पोलीस कर्मचारी म्हणजे कायद्याचे रक्षक... गुन्हा घडला की मागावर असलेल्या आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र डोळ्यांत तेल घालून जगणारा हा घटक मानला जातो. एका पायावर पोलीस स्टेशन तर दुसऱ्या पायावर घर अशी या कर्मचाऱ्यांची धडपड सुरू असते. शुक्रवारी सायंकाळी अचानक एका पोलीस अंमलदारांच्या घरी एसपी धिवरे यांनी अचानक भेट दिली. यावेळी तिथे पोचल्यावर त्यांनी घराबाहेरचा भीषण अंधार आणि लाईटची समस्या दिसून आली. केवळ इतकेच नव्हे, तर घरांची दुरावस्था आणि प्लास्टिंगचा प्रश्न समोर आला. एका महिला पोलीस अंमलदारांच्या पत्नीने मांडलेल्या या व्यथा ऐकून धिवरे यांनी तत्काळ कृती केली. त्यामुळे आता जळगांव जिल्हा पोलीस दलातून सध्या खरंच एस पी साहेब चांगलेच म्हणावे लागतील, अशा प्रतिक्रिया पोलीस कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.