10 घरफोड्या करून दोन वर्षे फरारी असलेल्याला अटक
मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई : पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती
पहा व्हिडीओ
मिरज : खरा पंचनामा
गेल्या दोन वर्षांपासून अनेक गंभीर गुन्ह्यात आणि घरफोडी गुन्ह्यात फरारी असलेल्या सिराज उर्फ किरण सिसफुल भोसले (वय 32, रा. आंबेडकर नगर बोलवाड) याच्यासह तिघांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
क्रांती जलवा भोसले आणि विश्वनाथ शिसफुल भोसले यानाही मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना पकडणाऱ्या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातीला सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बक्षीस देणार असल्याचे अधीक्षक दोषी यांनी यावेळी सांगितले.
किरण भोसले हा अनेक घरफोड्या मध्ये मुख्य आरोपी होता तो दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता.या कालावधीत त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील एकाला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा, मिरज शहरचे निरीक्षक किरण चौगले, ग्रामीणचे निरीक्षक सोमनाथ वाघ उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा, मिरज ग्रामीणचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रणजित तिप्पे, उपनिरीक्षक पांडुरंग मुंढे, पुनम मगदुम, अझर मुलाणी, रावसाहेब सुतार, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, अमोल ढोले, मिथुन गंगधर, राजेंद्र बाबर, मधुकर मदवान, भारत पवार, विकास भोसले, सुनंदा लोहार, अफसाना मुलाणी, दिपाली माळी, अपर्णा जाधव, दिपाली केंद्रे, वसंत कांचळे, संग्राम पाटील, स्वप्नील भोसले, उमेश राजगे, अनिल खोत, रामचंद्र शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.