Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एमआयटी कॉलेजचे बारावी परीक्षेत यशशंभर टक्के निकालाची परंपरा कायम

एमआयटी कॉलेजचे बारावी परीक्षेत यश
शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या विध्यार्थ्यांनी 100 टक्के निकालाची परंपरा बारावी बोर्ड परीक्षेत कायम राखली आहे. एमआयटी कॉलेज गुणवतेसाठी कायमच अग्रेसर राहिली आहे. यावर्षीही वाणिज्य आणि विज्ञान शाखेने 100 टक्के निकालाची परंपरा अबाधित ठेवली आहे.
पहिल्या तिन्ही क्रमांकवर मुलींनी बाजी मारली आहे. 
महाविद्यालयाची वैष्णवी ननवरे हिने प्रथम क्रमांकसह 90 टक्के गुण प्राप्त केले. अनुष्का मुळे 88.33 टक्के गुणांसह  व्दितीय तर गायत्री जाधवने 87 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे, डॉ ज्योती जोतवानी, प्राचार्य डॉ. केदार रोकडे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.