Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फर्निचर मॉलवर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सचा गोळीबारशुभम लोणकरची फेसबुक पोस्ट

फर्निचर मॉलवर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सचा गोळीबार
शुभम लोणकरची फेसबुक पोस्ट

पिंपरी : खरा पंचनामा 

कोयता गँगची दहशत आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्यात आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी-चिंचवड येथे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्प शुटर्सनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

काल रात्री 9 वाजून 24 मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडला. लॉरेन्स बिश्नोई गँगने पिंपरी-चिंचवड येथील प्रसिद्द 'एजे' फर्निचर मॉलवर गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे लॉरेन्स बिश्नोई गँगची महाराष्ट्रातील दहशत आणि विस्तार आणखी वाढत चालल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल लात्री 9 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोर बाईकवरुन एजे मॉलच्या समोर आले. या दोघांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून मॉलच्या दिशेने पाच ते सहा राऊंड फायर केले. या सगळ्या गोळ्या मॉलच्या नेमप्लेटवर झाडण्यात आल्या. यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची कसून तपासणी करत फॉरेन्सिक नमूने गोळा केले. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश इंगवले यांनी दिली.

या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या शुभम लोणकरने स्वतः घेतली आहे. त्याने तशी फेसबुक पोस्ट केली आहे. पोलिसांनी एजे फर्निचर मॉलबाहेरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मॉलच्या दिशेने 5-6 गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. या गोळ्यांमुळे मॉलची काच फुटली आहे. 'एजे' फर्निचर मॉल चे मालक अशोक नैन हे एमडी ड्रग्स तस्कर असल्याचा उल्लेख करत हा केवळ ट्रेलर आहे, यानंतर थेट गोळी डोक्यात असेल, असा इशारा बिश्नोई गँगकडून देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये AJ फर्निचर वर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली आहे. या अनुषंगाने लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ आरजू बिष्णोई याच्या नावाने एक ऑडिओ समोर आलाय. जो आमच्या विरोधात आहे, त्याची आणि आमची लवकरचं भेट होईल. असा इशारा ही या ऑडिओद्वारे देण्यात आलाय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.