Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

सांगली : खरा पंचनामा 

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर युवा मोर्चाच्या संघटन विस्तार आणि बळकटीकरणासाठी आले असता त्यांनी भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान कृष्णराज महाडिक यांनी रावसाहेब पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील कार्याचा तसेच ते कार्यरत असलेल्या विविध संस्थांचा आढावा घेतला. 

समाजकारण आणि संघटन बांधणीसाठी रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी विशेष गौरव व्यक्त केला. तसेच भाजपा युवा मोर्चासाठी त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी रावसाहेब पाटील यांनी कृष्णराज महाडिक यांच्यासारख्या युवा नेतृत्वाची भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्रातील युवकांमध्ये, विशेषतः सांगली-कोल्हापूर परिसरातील युवा वर्गात भाजपाविषयी नवचैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले.

कार्यक्रमात शांतिनाथ कर्वे यांची भाजपा युवा मोर्चाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपा जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख प्रशांत गोंडाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रशांत माने यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजपा जैन प्रकोष्ठ सांगली जिल्हाध्यक्ष महावीर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सागर पाटील, हर्षद पाटील तसेच भाजपा जैन प्रकोष्ठाचे पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.