विधानपरिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित
मुंबई : खरा पंचनामा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून यात मोठा सर्वाधिक जागा भाजपला मिळणार आहेत. अंतिम फॉर्म्युलानुसार, भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
भाजप दोन पाऊल मागे येत शिवसेनेला 4 जागा आणि राष्ट्रवादीला 2 जागा देण्यास तयार आहे. मागील काही दिवसांपासून या 17 जागांसाठी महायुती पक्षात रस्सीखेच सुरू होती.
एकनाथ शिंदे देखील दिल्लीत वरिष्ठांसोबतच्या चर्चेसाठी दिल्लीत तळ ठोकून होते. मात्र आता 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
विधानपरिषद निवडणूकीचे वेळापत्रक
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 1 जून
उमेदवारी अर्जाची छाननी - 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (सकाळी 8 ते दुपारी 4)
मतमोजणी - 22 जून
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.