Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिलेचा दारू पिऊन नऱ्हे पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामामहिलेवर गुन्हा दाखल

महिलेचा दारू पिऊन नऱ्हे पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : खरा पंचनामा 

पुण्यात दारूच्या नशेत नऱ्हे पोलिस चौकीत महिलेने धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत नऱ्हे पोलिस चौकीत येऊन पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत धिंगाणा घातल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वय ४१ वर्षीय महिलेवर नहे पोलिस चौकीच्या पोलिस उपनिरीक्षक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला तक्रार देण्यासाठी चौकीत आली होती. २७ मे रोजी त्यांच्या सांगण्यावरून समोरील व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल का करण्यात आला नाही, या कारणावरून महिलेला संताप अनावर झाला. महिलेने चौकीत मोठ्याने आरडा ओरडा करत पोलिस कर्मचाऱ्यांशी अरेरावी व शिवीगाळ केली. चौकीतून बाहेर जाण्यास सांगूनही ती ऐकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी चौकीतील पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. काही काळ चौकीतील कामकाज विस्कळीत झाले होते.

महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत संबंधित महिला दारूच्या नशेत असल्याचा अहवाल देण्यात आला. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पुढील कारवाई करत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणे तसेच गोंधळ घालणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील नऱ्हे पोलिस चौकीत दारूच्या नशेत महिलेने धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे.

दारूच्या नशेत नऱ्हे पोलिस चौकीत येऊन पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत गोंधळ घातल्याप्रकरणी एका ४१ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नहे पोलिस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक यांनी याबाबत तक्रार दिली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित महिला तिच्या तक्रारीसंदर्भात चौकीत आली होती. यापूर्वी २७ मे रोजी तिच्या सांगण्यावरून समोरील व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने ती संतप्त झाली. याच कारणावरून तिने चौकीत मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत शिवीगाळही केली. पोलिसांनी तिला शांत राहण्याची तसेच चौकीबाहेर जाण्याची विनंती केली. मात्र ती कोणत्याही सूचना ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तिच्या गोंधळामुळे चौकीतील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. चौकीत आलेल्या इतर नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागला. तसेच नियमित तक्रारींची नोंद, चौकशी आणि इतर प्रशासकीय कामकाजावरही त्याचा परिणाम झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.