Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोदींना 'झालमुडी' देणाऱ्या दुकानदाराला जीवे मारण्याच्या धमक्याथेट पाकिस्तान अन् बांगलादेशातून फोन आल्याचा दावा

मोदींना 'झालमुडी' देणाऱ्या दुकानदाराला जीवे मारण्याच्या धमक्या
थेट पाकिस्तान अन् बांगलादेशातून फोन आल्याचा दावा

कोलकाता : खरा पंचनामा 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'झालमुरी'च्या व्हिडीओची मोठी चर्चा झाली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलेलं असतानाच पंतप्रधान मोदी यांनी झाडग्राम शहरात एक जाहीर सभा घेतली होती.

ही सभा संपल्यानंतर झाडग्राम शहरातून जात असताना पंतप्रधान मोदी यांचा ताफा अचानक थांबला होता आणि त्यानंतर मोदी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झालमुडीच्या दुकानावर जाऊन त्यांनी झालमुडीचा (तिखट भेळ) आस्वाद घेताना दिसून आले होते.

पंतप्रधान मोदी यांनी झालमुडीचा आस्वाद घेतल्याचा हा व्हिडीओ पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर देखील केला होता. त्यानंतर या व्हिडीओची देशभरात मोठी चर्चा झाली होती. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांना झालमुडी खाऊ घालणाऱ्या झालमुडी विक्रेत्याला पाकिस्तान आणि बांगलादेशामधून धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.