नीट प्रकरणात मोठा ट्विस्ट, पेपर लीक झालाच नाही!
परीक्षा रद्द करण्याचं कारण पहिल्यांदाच समोर
नवी दिल्ली : खरा पंचनामा
वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट परीक्षा (NEET2026) सध्या चांगलीच चर्चेत आहे. नीटचा पेपर फुटल्यामुळे केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सीबीआने अनेक जणांना अटक केलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या देखील काही जणांचा समावेश आहे. आरसीसीचे संचालक मोटेगावकर, पीव्ही कुलकर्णी, मनिषा मांढरे यांना सीबीआयने अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आलं आहे, ते म्हणजे या प्रकरणात राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) चे प्रमुख अभिषेक सिंह हे गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीसमोर हजर झाले, त्यांनी संसदेच्या स्थायी समितीसमोर मोठा दावा केला आहे. नीट 2026 चा कोणताही पेपर पूर्णपणे लीक झाला नव्हता, मात्र त्यातील काही प्रश्न लीक झाले होते, असा दावा अभिषेक सिंह यांनी केला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार परीक्षा आयोजित करणाऱ्या केंद्रीय एजन्सीकडून असा दावा करण्यात आला आहे की, परीक्षा रद्द करण्याचं प्रमुख कारणं हे परीक्षेत झालेल्या गैरमार्गांचा वापर हे आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीचे प्रमुख अभिषेक सिंह यांनी स्थायी समितीसमोर असा दावा केला आहे की परीक्षेदरम्यान अनियमितता आणि गैरप्रकारांची उदाहरणं समोर आली आहेत, मात्र पेपर पूर्णपणे लीक झाला नव्हता, परंतु नीटचे काही प्रश्न लीक होणं देखील गंभीर प्रकार आहे, यामुळे संपूर्ण परीक्षा प्रणालीवरील विश्वास डळमळू शकतो, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत बोलताना अभिषेक सिंह आणि उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव विनीत जोशी यांनी संसदीय समितीला सांगितं की, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. अधिकारी योग्य दिशेनं पुढे जात आहेत. पेपर लीक होऊ नये यासाठी काही शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत, आणखी काही गोष्टींवर काम सुरू आहे. पेपर पूर्णपणे लीक झाला नव्हता, मात्र काही प्रश्न लीक झाल्यानं ही परीक्षा रद्द करण्यात आली, अशी माहिती संसदीय समितीला देण्यात आली आहे. दरम्यान आता 21 जून रोजी पुन्हा एकदा नीटची परीक्षा घेतली जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.