Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दुचाकीची डिकी फोडून पोलिसाची चार लाखाची रोकड लंपास

दुचाकीची डिकी फोडून पोलिसाची चार लाखाची रोकड लंपास

भूम : खरा पंचनामा 

शहरात भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अर्जुन सुंदरराव मार्कड (रा. सोनगिरी) यांची दुचाकी फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल चार लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन मार्कड यांनी स्टेट बँकेतून सोनं तारण ठेवून चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम घेऊन ते पत्नीसमवेत दुचाकीने प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी प्रथम पंचर केली. त्यानंतर काही अंतरावर त्यांच्या पत्नीच्या अंगावर संशयास्पद पदार्थ फवारण्यात आल्याने तिला अचानक तीव्र खाज येऊ लागली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या दाम्पत्याने तात्काळ भूम ग्रामीण रुग्णालय गाठले. उपचारासाठी रुग्णालयात गेल्यानंतर दुचाकी (क्र. एमएच 33 ई 2057) बाहेर पार्क करण्यात आली होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत दुचाकीच्या डिक्कीचे लॉक स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने तोडून त्यातील चार लाख रुपयांची रोकड चोरून नेली.

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. भूम ग्रामीण रुग्णालय परिसरात भूम पोलीसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. घटनेच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून संबंधित मार्गावर कॅमेरा आहे का याची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.