Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 230 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या : 37 जणांना मुदतवाढ संजय मोरे, अनिल तनपुरे यांची सीआयडी पुणे येथे नियुक्ती

राज्यातील 230 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या : 37 जणांना मुदतवाढ 
संजय मोरे, अनिल तनपुरे यांची सीआयडी पुणे येथे नियुक्ती 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील कालावधी पूर्ण झालेल्या 169 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील 37 अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. कालावधी पूर्ण नाही झालेल्या 98 निरीक्षकांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरच्या गांधीनगरचे प्रभारी अनिल तनपुरे तसेच सांगलीतील विशेष शाखेचे प्रभारी संजय मोरे यांची पुणे सीआयडीकडे बदली करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया यादव पाटील यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातून निरीक्षक तनपुरे यांची बदली झाली असून जात प्रमाणपत्र पडताळणीच्या निरीक्षक केतकी खोत यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अजित जाधव, तुरची पिटीसीकडील विकास जाधव जिल्ह्यात नव्याने दाखल होणार आहेत.

सांगलीतील निरीक्षक मोरे यांची बदली झाली असून तुरची पिटीसीचे ब्रम्हानंद सूर्यवंशी यांची मुंबई शहरकडे बदली झाली आहे. जात पडताळणीच्या निरीक्षक मीनल कोळेकर यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात सुधीर तोरडमल, संतोष पवार हे निरीक्षक नव्याने दाखल होणार आहेत.

साताऱ्यातील विकास धस यांची नाशिक अकादमी, बापूसाहेब सांडभोर यांची पुणे शहर, अविनाश कवितकर यांची मुंबई शहरकडे बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यात हर्षद गालिंदे नव्याने दाखल होणार आहेत.

पुणे ग्रामीणचे अनिल अवचर यांची जात पडताळणी पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तर किसन गुंड नव्याने दाखल होणार आहेत. सोलापूर ग्रामीणकडे अविनाश पवार नव्याने दाखल होणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.